News - पाण्याचे दुर्भिक्ष थांबविण्यासाठी उच्च तंत्रज्ञान आवश्यक – अनंतराव गीते

चिपळून येथे जलसाहित्य संमेलनाचे शानदार उद्घाटन, १० वे जल साहित्य संमेलन स्व. भवरलालजी जैन नगर

चिपळूण – राज्यातील अनेक भागात एकीकडे पाण्याचे दुर्कक्षिक्ष आहे तर दुसऱ्या बाजूला आमच्या कोकणात न थांबणारे पाणी आहे. एवढे पाणी असूनही उन्हाळ्यात कोकणाच्या वाट्याला येणारी दुर्भीक्षता थांबवायची असेल तर उच्च तंत्रज्ञानाच्या अवलंब केल्याशिवाय तरणोपाय नाही. असे स्पष्ट प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अऩंतराव गीते यांनी केले. चिपळून येथील स्व. भवरलालजी जैन नगर येथे आयोजित १० व्या जल साहित्यसंमेलनाच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते.

जलविषयक साक्षरता चळवळीतून ग्रामीण भागात प्रसारप्रचार व्हावा या उद्देशाने आयोजित या जल साहित्य संमेलनास रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्रजी वायकर, डॉ. अशोकराव कुकडे, जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर, आमदार सदानंदजी चव्हाण, जैन इरिगेशनचे विपणन प्रमुख अभय जैन, गजानन देशपांडे, आनंद गुप्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

कोकणातील भूमी पाण्याचा निचरा इथली जमीन निचरा करणारी आहे. इथे धो धो पडणारे पाणी एका तासात समुद्रात जाऊन मिळते. हे वाहून जाणारे पाणी जर अडविता आले तर कोकणात उन्हाळ्यात जाणवणारी पाण्याची टंचाई संपुष्टात येईल. एकीकडे पिण्याचा प्रश्न तर दुसऱ्या बाजुला इथल्या कृषिक्षेत्राचा विकास साध्य करणे ही काळाची गरज आहे. सुदैवाने जैन इरिगेशन सारखी कृषि क्षेत्रात आघाडीवर असलेली कंपनी कोकणासाठी काही करू पाहते आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जैन इरिगेशनचे अतिघनदाट आंबा लागवड तंत्रज्ञान महत्त्वाचे असून येथील शेतकऱ्यांच्या भवितव्याची बिजे यात असल्याचा गौरोद्गारही त्यांनी काढला.

कोकणात लाखो हेक्टर शेतजमीन आहे त्या तुलनेत सिंचन मात्र काही हजार हेक्टर क्षेत्रापुरतेच आहे. ही स्थिती बदलण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोकणातल्या केळीच्या पुनरुज्जीवनासाठी अऩेक शेतकरी आता सामूहीक पातळीवर पुढे येऊन उच्च तंत्रज्ञान अंगिकारत असून याला आम्ही चालना देऊ असे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र वायकर यांनी स्पष्ट केले.

कोकणातील शेतकऱ्यांचा विकास व्हावा यासाठी जैन इरिगेशन प्रयत्नशील असून या भागात आंबा पिकाच्या अतिघनदाट लागवड तंत्रज्ञानापासून ते प्रक्रिया उद्योगापर्यंत आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करून असे निःसंधिग्ध प्रतिपादन विपणन संचालक अभय जैन म्हणाले.

लातुरला आजही आठवड्यातून एकदा पाणी गत वर्षाच्या मार्चपासून नळ बंद. 20 हजार बोअर पैकी 4 हजार बोअर शिल्लक. पाण्याची टंचाई ही मनुष्यांनी निर्माण केलेला आजार आहे, हे पाणप लक्षात घेतले पाहिजे. आम्ही 16 कि.मी. मांजरेचे पात्र लोकसहभागातून मोकळा केला. शासनाचे अंदाजपत्रक होते 40 कोटी. आम्ही हे काम केले 8 कोटी रुपयांमध्ये. 30 बुलडोझर दिवसरात्र सुरू, गाळ काढायला मला हवा हे मोठे ट्रक, कोणी पावत्या मागीतल्या नाहीत पण आम्ही रोज व्हाटस्अपवर हिशेब दिले. लोक जागे झाले तर कोणत्याही आव्हानांवर मात करता येते हे कुकडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.

या संमेलनातील जे काही ठराव होतील ज्या शिफारशी होतील त्याची सरकार पातळीवर अंमलबजावणी केली जाईल याची मी हमी देतो. इथल्या प्रकल्पांसाठी आम्ही दक्ष आहोत. एका बाजूला आपण पाण्याच्या नियोजनाकडे व दुसऱ्या बाजूला साक्षरतेकडे लक्ष दिले पाहिजे.

२००२ मध्ये माधवराव चितळे यांच्या पुढाकारातून ही संस्था स्थापन झाली. जलचळवळीला चालना मिळावी या उद्देशाने आपण हे संमेलन घेत असल्याची माहिती जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. दत्ता देशकर यांनी दिली. हे संमेलन आजवर आम्ही विविध भागात घेत असल्याने त्या त्या भागातील पाणी विषयक प्रश्नांना वाचा फुटली असे ते म्हणाले. जलसाक्षर समान झाला तरच या देशाची भवितव्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील अनेक भागात पाण्याचे दुर्भीक्ष आहे. अनेक गावांना 15 दिवसाआड पाणी. आपल्याकडे सुदैवाने पाणी चांगले आहे. स्थिती चांगली जरी असली तरी यापुढे आपण दक्ष असले पाहिजे. येथे नियोजनाचा अभाव असल्यामुळे पाणी असूनही दुर्भीक्ष आपण पाहतो.

चिपळूनने साहित्य संमेलन घेण्यासाठी पुढाकार घेतला याचे समाधान असल्याचे अनेक वक्ते म्हणाले. हे संमेलन आम्हाला जागे करण्याकरीता आहे असे मी समजतो हे संमेलन उद्यासाठी उज्जवल करण्यासाठी आहे.

 

 

 

Bhavarlalji Hiralalji Jain (Bhau)
         
Copyright © 2014 Jain Irrigation Systems Ltd, All Rights Reserved